असाही यावा दिवस एकदा...
नसावे कुठले बेत आखले,
नसाव्या आठवणी, नसावी स्वप्ने.
पाउल उठता पंख फुटावे,
झेप घेउनी उंच उडावे.
ढग कुठला शोधुनी एकला
त्यावर अल्गद जाउन बसावे.
प्रसन्न झुळूक एक स्पर्शुनी जावी
शुन्य शांतता आत रूजावी.
मिटता डोळे "मी" संपावा
धुके सरुनी प्रकाश दिसावा
तुझ्या डोळ्यांनी मग तुला पहावे
हळूच सारे गूज उल्गडावे!
- श्वेता
(better readable in IE)
Labels: Marathi
3 Comments:
Ai ga..
I could read it as well in Mozilla Firefox.Amazingly meaningful poem.Simple and very,very beautiful.Much like its writer. :)
Shweta is it you.....?
Post a Comment
<< Home